Advertisement

१८ ते ४४ वयोगटाला कोरोना लसीसाठी नोंदणी बंधनकारक

देशात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरूवात होणार आहे. मात्र ही लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.

१८ ते ४४ वयोगटाला कोरोना लसीसाठी नोंदणी बंधनकारक
SHARES

देशात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरूवात होणार आहे.  मात्र ही लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलं आहे. ही नोंदणी बुधवारपासून (२८ एप्रिल) सुरू होणार आहे. नोंदणी न करताच लसीकरण केंद्रावर थेट जाऊन  लस मिळणार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

लसीकरण सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने लस घेण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगाऊ नोंदणी करून वेळ ठरवून लस घेणं अपेक्षित आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं लसीकरणासाठी नोंदणी केली जात होती. तसंच थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आधार कार्ड दाखवूनही लसीकरण करता येत होतं. आता मात्र ही सुविधा नसणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे.

१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी ‘कोविन’ किंवा ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपवर २८ एप्रिलपासून नोंदणी करता येईल. लसीकरणाची प्रक्रिया व कागदपत्रे या सर्व अटी सारख्याच असतील.  लसीकरणावेळी आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे.

खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण करायचं असेल, तर पैसे मोजून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध असेल. सरकारी आणि खासगी असे दोन्ही पर्याय रुग्णांना उपलब्ध असतील. मात्र, सरकारी केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही एकमेव पद्धत असणार आहे.  

सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस राज्य  सरकारांना ४०० रुपये, तर खासगी हॉस्पिटल्सना ६०० रुपये या दरानं विकत मिळणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपयांना तर खासगी हॉस्पिटल्सना १२०० रुपये दरानं मिळणार आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा