Advertisement

रिलायन्स समूहातील 'आलोक इंडस्ट्रीज' बनवणार स्वस्तातले पीपीई किट्स

रिलायन्समधल्या आलोक इंडस्ट्रीजनं पीपीई किट्ससाठी पुढाकार घेतला आहे.

रिलायन्स समूहातील 'आलोक इंडस्ट्रीज' बनवणार स्वस्तातले पीपीई किट्स
SHARES

कोरोना रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व परिस्थितीत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकिय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी डॉक्टरांना पीपीई किट्स आवश्यक आहेत. मध्यंतरी चायनावरून पीपीई किट्स मागवण्यात आले होते. पण त्याचा दर्जा योग्य नव्हता आणि किंमतही जास्त होती. त्यामुळे आता रिलायन्स इंडस्ट्रीज पुढाकार घेतला आहे.      

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)नं समूहातील टेक्सटाइल आणि फॅब्रिक वस्त्र बनवणारी 'आलोक इंडस्ट्रीज' (Alok Industries) या नवीन कंपनीचं पीपीई बनवणाऱ्या कंपनीमध्ये रुपांतरण केलं आहे. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात संरक्षणात्मक पीपीई बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यांची किंमत चीनमधून मागवलेल्या PPE च्या तुलनेत एक तृतीयांश इतकी असेल.

गुजरातमधील सिल्व्हासामध्ये आलोक इंडस्ट्रीजच्या मॅन्यूफॅक्चरिंगचे पूनर्वसन करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याठिकाणी केवळ कोव्हिड-19 (COVID-19)शी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाइनवर काम करणारे इतर कर्मचारी यांकरता Personal Protective Equipment (PPE) बनवण्यात येणार आहेत.

दररोज एक लाखापेक्षा जास्त पीपीई किट बनवण्याची क्षमता याठिकाणी आहे. बाहेरून आयात केलेल्या पीपीई किट्सची किंमत प्रत्येकी २००० रुपये इतकी आहे. मात्र आलोक इंडस्ट्रीजमध्ये बनवण्यात येणाऱ्या किट्सची किंमत जवळपास ६५० रुपये असणार आहे.



हेही वाचा

दिलासादायक: वरळी कोळीवाड्यातील 'इतके' टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त

लवकरच रिअल टाइम डॅशबोर्डने कळणार रुग्णालयातील उपलब्ध खाटा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा