Advertisement

सेंट जॉर्ज रुग्णालयातील थॅलेसेमिया विभागाचं नुतनीकरण


सेंट जॉर्ज रुग्णालयातील थॅलेसेमिया विभागाचं नुतनीकरण
SHARES

आपल्या शरीरातील रक्त 15 दिवसांनी किंवा एक महिन्यांनी बदलावं लागलं तर? हा विचारच किती भयानक आहे. या आजाराला 'थॅलेसेमिया' म्हणतात. मुंबईसह राज्यात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पण, या आजाराविषयी जनजागृती कमी आहे. शिवाय, लहान मुलांना थॅलेसेमिया असण्याचं प्रमाणही वाढलंय. याच पार्श्वभूमीवर बुधवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात असणाऱ्या थॅलेसेमिया विभागाचं नुतनीकरण करुन नव्याने उद्घाटन करण्यात आलं.



सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दररोज जवळपास 10 ते 12 थॅलेसेमियाचे पेशंट येतात. या मुलांना आनंददायक वातावरण मिळावं, म्हणून विभागाचं नुतनीकरण करून 10 नवीन खाटा आणल्या गेल्या आहेत. एसी, इंडियन आणि वेस्टर्न पद्धतीचे शौचालय देखील या मुलांसाठी तयार करण्यात आले आहे. सध्या सेंट जॉर्जमध्ये 100 थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर उपचार सुरू आहेत.

ही सर्व मुलं मुंबई, टिटवाळा, भिवंडी, सुरत, मानखुर्द, रत्नागिरी या ठिकाणाहून सेंट जॉर्ज रुग्णालयात आली आहेत. या रूग्णांना उत्तम सेवा मिळावी, याकरता रूग्णालयात अत्याधुनिक थॅलेसेमिया विभाग तयार करण्यात आला आहे. थिंक फाऊंडेशन आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या प्रयत्नांनी हा विभाग तयार करण्यात आला आहे.

 सेंट जॉर्ज हे मुंबईतील पहिलंच रुग्णालय आहे, जिथे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर राबवण्यात आलं. थॅलेसेमिया विभागाचं उद्घाटन आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबीर यावेळी राबवण्यात आले.

डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय


मशीन्सचंही केलं उद्घाटन

रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमधील दोन अॅनेस्थेशिया मशिनचंही यावेळी उद्घाटन करण्यात आलं. शिवाय, ऑर्थोपेडिशियन्ससाठी लागणाऱ्या सी-आर्म मशीनचं देखील उद्घाटन करण्यात आलं.

त्याचबरोबर अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रक्तदान शिबीर, अवयवदान, नेत्रदान, मोफत फुल बॉडी चेक-अप, थायरॉईड, सीबीसी अशा तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या.



हेही वाचा

थॅलेसेमिया झाला म्हणून बापानं मुलीला टाकलं


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा