थॅलेसेमिया झाला म्हणून बापानं मुलीला टाकलं


थॅलेसेमिया झाला म्हणून बापानं मुलीला टाकलं
SHARES

एकीकडे मुलींच्या जन्मदराचा प्रश्न गंभीर झालेला असताना थॅलेसेमिया नावाचा आजार झाला म्हणून बापानंच पोटच्या मुलीला सोडून दिलं आहे. एवढंच नाही, तर त्यानं मुलीसोबतच बायकोलाही सोडून दिलं आहे. त्यामुळे खरंच लोकांची संवेदनशीलता मरत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.


अवघ्या एका वर्षाच्या मेहेरला थॅलेसेमिया

मेहेर इनामदार ही एक वर्षांची चिमुरडी थॅलेसेमिया या आजारानं ग्रस्त आहे. सीएसएमटीच्या सेंट जॉर्ज सरकारी रुग्णालयात गेल्या 6 महिन्यांपासून तिच्यावर उपचारही सुरु आहेत. पण आपल्या मुलीला थॅलेसेमिया आहे हे कळल्यानंतर मेहेरच्या वडिलांनी मेहेर आणि तिची आई रेश्मा या दोघींना घरातून काढून टाकलं. त्यांची कोणतीही विचारपूस ते करत नाहीत. त्यामुळे सध्या रेश्मा तिच्या आईकडे कुलाब्याला रहात आहे.

मेहेर ६ महिन्यांची असताना तिला थॅलेसेमियाचं निदान झालं. मेहेरला हा आजार आयुष्यभरासाठी आहे. यामुळेच तिच्या वडिलांनी आम्हाला टाकून दिलं. आता मी माझ्या आईकडे राहत आहे. माझ्या भावालाही थॅलेसेमिया आजार आहे.

रेश्मा शेख इनामदार, मेहेरची आई


मेहेरला ६ महिन्यांपासून थेलेसेमिया

जन्माला आल्यापासूनच मेहेर आजारी असायची. तिच्या आजारावर उपचार करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी बऱ्याच तपासण्याही केल्या. अखेर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये केलेल्या तपासणीमध्ये मेहेरला थॅरेसेमिया असल्याचं निदान झालं. पण यावेळी उपचारासाठी मेहेर आणि तिची आई रेश्मा या दोघींना तिच्या वडिलांनी रुग्णालयात आणून सोडले, ते नंतर कधी फिरकलेच नाहीत.



हेही वाचा

पैशांसाठी चिमुकल्या मित्राची हत्या, मृतदेह सापडला भाईंदरच्या खाडीत


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा