तिसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरू

    मुंबई  -  

    मुंबई - गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील आणि मुंबईतील निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. पहिले दोन दिवस तर रुग्णांना आत सोडले जात नव्हते, पण काल दुपारनंतर रुग्णांना आत सोडले जात होते. पण, अजूनही रुग्णांवर उपचार होत नाही. मुंबईसह देशभरातून रुग्ण तपासणीसाठी या रुग्णालयात येत असतात. अनेक रुग्णांना डॉक्टर भेटत नसल्याने रुग्ण संताप व्यक्त करत आहेत. याच दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने निवासी डॉक्टरांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.  या प्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारलं होतं आणि संप मागे घेण्याचे आदेश दिले होते. पण, तरीही डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. पण, मुख्य न्यायाधीश गैरहजर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.     Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.