निवासी डॉक्टर अजूनही सुट्टीवरच

 Sion
निवासी डॉक्टर अजूनही सुट्टीवरच

मुंबई - गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेला संप मार्डने मागे घेतला आहे. मुंबई हायकोर्टाच्या लेखी अाश्वासनानंतर मार्डने निवासी डॉक्टरांना कामावर रूजू होण्याचं आवाहन केलं. मात्र मार्डच्या आवाहनानंतरही अद्याप निवासी डॉक्टर कामावर रूजू झालेले नाहीत.

राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर सामुहीक सुट्टीवर गेले आहेत. सामुहीक सुट्टी हा निवासी डॉक्टरांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे पुन्हा कामावर रूजू व्हा, असे आवाहन मार्डने केले. जोपर्यंत लेखी अाश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कामावर रूजू होणार नाही, अशी भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतली होती. मात्र आता लेखी आश्वासनानंतर तरी निवासी डॉक्टर कामावर रूजू होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Loading Comments