Advertisement

सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली

सर्दी, खोकला आणि घसादुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत. त्यामुळे यापैकी काहीही होताच लोकांनी त्यावरची औषधं घेण्यास सुरुवात केली आहे.

सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली
SHARES

सर्दी, खोकला आणि घसादुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत. त्यामुळे यापैकी काहीही होताच लोकांनी त्यावरची औषधं घेण्यास सुरुवात केली आहे.  या आजारांवरील पॅरासिटामोल, क्लोरोक्वीन व अन्य औषधांची मागणी यामुळे आता दुपटीनं वाढली आहे. विशेष म्हणजे कोणताही कसलाही आजार नसलेले लोक काळजीपोटी ही औषधं घेऊन ठेवू लागले आहेत.

 घशाची खवखव, वारंवार शिंक येणे, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत मात्र, एरव्हीही याचा त्रास अनेकांना होतो. डॉक्टरांकडून अशा रुग्णांना आवश्यकतेनुसार पॅरासिटामोल, अॅजिथ्रोमायसिन अशी औषधं दिली जातात.  हे आजार झाले म्हणजे कोरोनाची लागण झाली असे नसते. मात्र,  लोक मेडिकलमधून आधीच ही औषधं घेऊन ठेवू लागले आहेत. क्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या आजारावर लागू पडत असल्याची चर्चा देशभरात आहे. त्यामुळं हे औषध लोकं घेत आहेत. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशनशिवाय लोक ही औषधं मागत आहेत. त्यामुळं काही केमिस्टनी अशा पद्धतीनं औषधं देणं बंद केलं आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मात्र याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोरोनासारख्या भयंकर आजारात काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं योग्य नाही. कुणाला काही त्रास वाटत असेल तर जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सूचनेनुसारच काळजी घ्यावी, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.



हेही वाचा -

Coronavirus : कोरोना स्टॉप करोना, बॉलिवूडची मोहीम

Coronavirus Lockdown : घर बसल्या फुल टू मनोरंजन, पाहा या ५ मराठी वेबसिरीज




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा