जागतिक एड्स दिनानिमित्त प्रदर्शन

 Pali Hill
जागतिक एड्स दिनानिमित्त प्रदर्शन

मुंबई - जागतिक एड्स दिनानिमित्त बुधावारी मंत्रालयात माहिती प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. या वेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत, राज्यमंत्री विजय देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सैनिक आणि महाराष्ट्र राज्य एड्स निर्मूलन संस्थाचे प्रकल्प संचालक कमलाकर फंड आदी मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्थेच्या वतीनं 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत हे तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलंय. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या दोन दिवसांत रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलंय. एचआयव्ही बाधित स्त्रिया, मुली आणि पुरुषांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी त्यांनी तयार केलेल्या अनेक गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आलंय. गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा एड्सबाधितांचं प्रमाण घटल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एड्स निर्मूलन संस्था प्रकल्प संचालक कमलाकर फंड यांनी दिली.

Loading Comments