Advertisement

एटीएम कार्ड क्लोन करुन १ हजार लोकांना लुटले, ८ जणांना अटक

एचडीएफसी बँकेच्या खात्यातून नागरिकांचे पैसे एटीएमच्या माध्यमातून गेल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली.

एटीएम कार्ड क्लोन करुन १ हजार लोकांना लुटले, ८ जणांना अटक
SHARES

स्किमर मशिनच्या सहाय्याने एटीएम कार्ड क्लोन करून एटीएम पिनच्या मदतीने खात्यातून पैसे लंपास करणाऱ्या ८ जणांच्या टोळीला मुंबई गुन्हे शाखा ९ ने अटक केली आहे. या टोळीने तब्बल १ हजार जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.  

एचडीएफसी बँकेच्या खात्यातून नागरिकांचे पैसे एटीएमच्या माध्यमातून गेल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने एटीएम कार्ड क्लोन करून पैस काढल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या सर्व आरोपींनी आतापर्यंत १ हजार पेक्षा जास्त नागरिकांना मुंबईत लुटले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप, नऊ स्किमर मशीन, कॉपीराईट मशीन २०० पेक्षा मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड, ३ मोबाईल तर २७ हजार रुपये जप्त केले आहेत. आरोपी या स्किम मशीनला कोड भाषेत उंंदीर बोलत असत. कॉपीराईट करण्यासाठी वापरत असणाऱ्या मशीनला घूस बोललं जात असे.  क्लोनिंग केलेल्या कार्डमधून आरोपी सातारा, सांगली ,कोल्हापूर अशा विविध भागात जाऊन पैसे काढत. 

एटीएम कार्ड क्लोन करून गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारपासून तुम्ही देखील सावध राहा. तुमचे एटीम कार्ड पिन कुणाला देऊ नका. नाहीतर आरोपीकडे असणाऱ्या 'उंदीर'च्या माध्यमातून पैशाची लूट होऊ शकते, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा