पंतनगरमध्ये रक्तदान शिबीर

 Ghatkopar
पंतनगरमध्ये रक्तदान शिबीर
पंतनगरमध्ये रक्तदान शिबीर
पंतनगरमध्ये रक्तदान शिबीर
पंतनगरमध्ये रक्तदान शिबीर
पंतनगरमध्ये रक्तदान शिबीर
See all

घाटकोपर - पंतनगरमधील मराठी विद्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जय जगन्नाथ फाउंडेशनच्या वतीनं हे शिबिर घेण्यात आलं. शिबीर सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत चाललं. शिबिरात एकूण 59 जणांनी रक्तदान केलं. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्रही देण्यात आलं. जय जगन्नाथ फाउंडेशनकडून प्रथमच असा उपक्रम घेण्यात आला होता. वेळेवर रक्त मिळत नसल्यानं अनेकांना प्राण गमवावे लागतात. एखाद्या गरजू व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास तात्काळ त्याला रक्त मिळावं, हाच आमचा उद्देश असल्याचं जय जगन्नाथ फाउंडेशचे प्रमुख सुशांत दास या वेळी म्हणाले.

Loading Comments