Advertisement

कल्याण-डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे

सध्या ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून लसीकरण केंद्रांबाहेर येऊन उभे राहतात.

कल्याण-डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे
SHARES

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर फार ताटकळत रहावं लागू नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतला आहे. डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा भागात ही स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. 

सध्या ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून लसीकरण केंद्रांबाहेर येऊन उभे राहतात. काहींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असतात. काही नागरिकांना लसीकरण केंद्रावर आणताना घरातील एक ते दोन जण येतात. त्यामुळे केंद्रावर अनावश्यक गर्दी होते, असं आढळून आलं आहे. 

या गर्दीमुळे ६० पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर अंतिम टप्प्यात आला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्यामध्ये नुकतीच बैठक झाली.  बैठकीत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा पूर्व, पश्चिम भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्यासंबंधी चाचपणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

महापालिकेच्या शाळा, इमारतींमध्ये तळमजल्याला केंद्रे सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. या केंद्रांवर फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या आणि दुसऱ्या लशीची मात्रा देण्यात येणार असून कोणत्याही लाभार्थ्यांला या केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. 



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा