Advertisement

धूम्रपान, तंबाखूचं व्यसन असणाऱ्यांसाठी कोरोना अधिक धोकादायक?

आज आपण जाणून घेऊयात की स्मोकिंग केल्यानं नेमकं काय होतं? आणि त्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर ते अधिक धोकादायक का आहे?

धूम्रपान, तंबाखूचं व्यसन असणाऱ्यांसाठी कोरोना अधिक धोकादायक?
SHARES

'हर फिक्र को धुए मे उडाता चला गया..' हे गाणं सिनेमापुरतं ठीक आहे. पण, असंच सगळ्या चिंता सिगरेटच्या धुरात फुंकून टाकायाच्या विचारात असाल; तर सावध व्हा. कारण कोरोना विषाणूची साथ पसरत असताना स्मोकिंग म्हणजे धूम्रपान, कुठल्याही प्रकारच्या तंबाखूचं सेवन करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या आसपासच्या प्रत्येकासाठी घातक ठरू शकतं.

आज आपण जाणून घेऊयात की स्मोकिंग केल्यानं नेमकं काय होतं? आणि त्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर ते अधिक धोकादायक का आहे?

कोणत्या आजारांचा धोका?

  • COVID
  • ब्रेन स्ट्रोक
  • हृदयविकार
  • दमा
  • फुफ्फुसांचा कॅन्सर
  • श्वसनविषयक आजार
  • फुफ्फुसांचे आजार
  • मधुमेह
  • फफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम
  • तंबाखू हे क्षयरोग होण्‍याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणा-यांमध्ये देखील टीबी, ३ पट अधिक आढळतो

धूम्रपानाचे इतर परिणाम

  • पुरुषांच्या स्पर्म काऊंटवर परिणाम होतो
  • तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते आणि रजोनिवृत्ति लवकर होते
  • धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते
  • ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो
  • ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते किंवा मूल कमी वजनाचे होते
  • बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो

'असा' वाढतो कोरोनाचा धोका

१) कोरोनाव्हायरस सारखे विषाणू प्रामुख्यानं माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतात. विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या श्वसनमार्गाला सूज येते. गंभीर स्वरुपाचा संसर्ग असेल न्यूमोनिया होतो, म्हणजे फुफ्फुसांतल्या हवेसाठीच्या पोकळ्यांमध्ये द्रवपदार्थ साठू लागतो. त्यामुळं श्वास घेण्यात अडथळा येतो आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी कमी होत जातो.

२) धूम्रपानाची सवय असेल, तर ही प्रक्रिया तीव्रतेनं किंवा वेगानं होण्याची भीती वाढते. त्यामुळं कोरोनाविषाणूचा धोका टाळण्यासाठी सिगरेट ओढण्याचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे.

३) धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

४) धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना न्यूमोनिया होण्याची शक्यता दुप्पट असते.

५) रोगप्रतिकारक क्षमता हीच सध्या आपली आजाराविरूद्धची ढाल आहे. पण सिगरेट आणि तंबाखूमुळं रोगांचा प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता कमी होते.

अहवालातून धक्कादायक माहिती उघड

१) धूम्रपान करणाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची गरज इतर रुग्णांपेक्षा दुप्पट असते.

२) पुण्यातील ४८ टक्के पुरुषांना, तर ५३ टक्के महिलांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता बिघडल्यानं त्यांना करोनाच्या संसर्गाचा धोका असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. 'इंड्स हेल्थ प्लस'नं २०१८ ते २०२१ दरम्यान यावर संशोधन केलं.

३) याद्वारे राज्यातील २९ हजार ५४८ व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये पुण्यातील ४ हजार १२४ व्यक्तींचा समावेश आहे.

४) पुण्यात ४८ टक्के, तर महिलांमध्ये ५३ टक्के फुफ्फुसाची कार्यक्षमता खराब झाल्याचं अहवालात अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


तंबाखू सोडल्यास 'असा' होईल शरीराला फायदा

  • २० मिनिटांनी वाढलेली हृदयाची गती, बीपी सामान्य होणं सुरू होते
  • १२ तासांत रक्तातील कार्बन मोनोऑक्साइडचा स्तर कमी होतो
  • ४८ तासांत तोंडाची चव, गंधाच्या क्षमतेत सुधारणा होणं सुरू होतं
  • २ आठवडे ते ३ महिन्यांत हृदय विकाराचा धोका कमी होतो
  • रक्ताभिसरण सुधारते, फुप्फुसांची कार्यप्रणाली चांगली काम करते
  • १ ते ९ महिन्यांत धाप लागणं कमी होतं
  • श्वास फुलून येत नाही
  • १ वर्षातच हृदयातील धमन्यांबाबतचा धोका निम्म्यावर येतो

धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी टिप्स

  • ऐशट्रे, सिगरेटी, पान, ज़र्दा लपवून ठेवा, जे नजरेसमोर नसते ते आठवत पण नाही
  • तुमचा कंपू किंवा गट, सिगरेटी, पान, ज़र्दा खातो कां? असं असल्यास पहिल्यांदा त्यांना टाळायचा प्रयत्न करा किंवा ते जेव्हा, सिगरेटी, पान, ज़र्दा खात असतील तेव्हा त्यांच्या पासून दूर व्हा
  • तोंडात च्‍यूइंगम, चॉकलेट, पे‍परमिंट, लॉज़ेंजेस ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा
  • जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्यानं किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या
  • एक पेला पाणी प्या आणि व्यायामानं देखील तल्लफ घालवण्यास मदत होते
  • जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा
  • पोषक आहार घ्या!



हेही वाचा

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे होणार Walk In Vaccination, 'या' रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा

रिलायन्स करणार कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांचं मोफत लसीकरण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा