Advertisement

कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी राज्य सरकारकडून SOP जाहीर

अखेर आज राज्य सरकारने कोविड सेंटरसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी राज्य सरकारकडून SOP जाहीर
SHARES

राज्यातील कोविड सेंटर (Covid Center)मध्ये महिलांवर अत्याचार (Women harassment) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

यामुळे कोविड सेंटंरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसओपी जाहीर करावी अशी मागणी जोर धरत होती. अखेर आज राज्य सरकारने कोविड सेंटरसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना तात्काळ लागू करण्यात याव्यात असंही राज्य सरकारनं म्हटलं आहे. तसंच सीसीटीव्हीची देखरेख सुद्धा असणं सुद्धा आवश्यक आहे आणि महिला कोविड वॉर्डमध्ये उपचारासाठी महिला वैद्यकीय अधिकारी असणं बंधणकारक असल्याचंही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

  • प्रत्येक महिला कोविड वॉर्डमध्ये पॅनिक अलार्म बटणे अनिवार्य
  • सीसीटीव्हीची देखरेख असावी
  • महिला कोविड वॉर्डमध्ये महिला वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टरांची उपस्थिती अनिवार्य
  • कोविड उपचारासाठी स्वतंत्र महिला वॉर्ड असणं आवश्यक आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग आल्यापासून गेल्या वर्षभराच्या कालावधीत राज्यातील विविध भागांत कोविड वॉर्ड तयार करण्यात आलं. मात्र, याच कोविड वॉर्डमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारनं महिला कोविड वॉर्ड संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.



हेही वाचा

कोरोना उपचारासाठी आता रेमडेसिवीर वापरलं जाणार नाही, WHO चा निर्णय

राज्यात नवीन रुग्णांचा आकडा ३० हजारांखाली

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा