Advertisement

कोरोना उपचारासाठी आता रेमडेसिवीर वापरलं जाणार नाही, WHO चा निर्णय

कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे रेमडेसिवीरची मोठी मागणी होती.

कोरोना उपचारासाठी आता रेमडेसिवीर वापरलं जाणार नाही, WHO चा निर्णय
SHARES

कोरोना रुग्णावरील उपचारासाठी आता रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 

रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे रेमडेसिव्हीरची मोठी मागणी होती. तर रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यामुळे काळाबाजार झाल्याचं दिसून आलं. दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल ३५ ते ४० हजारापर्यंत विकलं गेलं. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटकही केली आहे. 



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा