Advertisement

राज्यात नवीन रुग्णांचा आकडा ३० हजारांखाली

मागील काही दिवसांपासून ६० हजारांच्या वर रोजची रुग्णसंख्या गेली होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे

राज्यात नवीन रुग्णांचा आकडा ३० हजारांखाली
SHARES

राज्यातील कोरोना रुग्णांची आता घटत असल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून ६० हजारांच्या वर रोजची रुग्णसंख्या गेली होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे. आता नवीन रुग्णांचा आकडा ३० हजारांच्या खाली आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

गुरूवारी राज्यात २९ हजार ९११ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ४७ हजार ३७१ रुग्णांंना घरी सोडण्यात आलं आहे. तसंच ७३८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर मुंबईत १४२५ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तर १४६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत ५९ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

आतापर्यंत एकूण ५०,२६,३०८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.४३ टक्के झालं आहे. तर आतापर्यंत ८५ हजार ३५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२१,५४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,९७,४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९,३५,४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,८३,२५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा