Advertisement

सेंट जॉर्ज रुग्णालयात रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीनंतर आता मुंबई व उपनगरात तिसऱ्या टप्प्यातील रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी सुरू आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालयात रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी
SHARES

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीनंतर आता मुंबई व उपनगरात तिसऱ्या टप्प्यातील रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी सुरू आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात सुरू असलेल्या या मानवी लस चाचणीत आतापर्यंत १४४ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. जानेवारीत या स्वयंसेवकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

नोव्हेंबर महिन्यांत सेंट जॉर्ज रुग्णालय या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी सहभागी झाले. त्या वेळी १८ स्वयसेंवकांनी नोंदणी करून सहभाग घेतला, त्यापैकी सहा डॉक्टर्स होते. त्यानंतर नुकताच या रुग्णालयाने लसीचा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी २० ते ३० जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्यात आली. मात्र, प्रशासनानं दिलेल्या निर्देशांनुसार या लसीच्या चाचणीविषयी गोपनीयता पाळण्यात आली. या लसीच्या मानवी चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सहभाग घेतला.

सुरुवातीस १०० जणांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली, त्यानंतर अनेक जण लस घेण्याविषयी सकारात्म असल्यानं लाभार्थ्यांची संख्या वाढली. एकूण १४४ लाभार्थ्यांपैकी ४४ लाभार्थी हे खासगी रुग्णालयातील डॉक्टर आहेत. स्पुटनिक व्ही या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांविषयी वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सट’मध्ये अभ्यास अहवाल मांडण्यात आला आहे.

या अहवालानुसार कोविडविरोधात ही लस ९० टक्के सुरक्षित व उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे. लस घेतलेल्या लाभार्थ्यांना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनप्रमाणे या लसीचाही दुसरा डोस आवश्यक असून, २८ दिवसांनंतर तो घेणे आवश्यक आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा