Advertisement

तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारची हेल्पलाईन


तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारची हेल्पलाईन
SHARES

तंबाखूचं सेवन टाळण्यासाठी महाराष्ट्रात अनेक कायदे आहेत. पण, ते जरी असले, तरी त्याची किती प्रमाणात अंमलबजावणी केली जाते? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच, राज्य सरकार लवकरच तंबाखूमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी एक हेल्पलाईन सुरू करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. १४ नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून टाटा मेमोरिअल ट्रस्टने मुलांमध्ये वाढत्या तंबाखूच्या सेवनाला कशा पद्धतीने आळा घालता येईल? या विषयासाठी मंगळवारी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

मुलांमध्ये तंबाखूची सुरुवात मुळापासून कमी करण्यासाठी गृहमंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कोटपा (सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 ) आणि ज्युवेनाईल जस्टिस (किशोरवयीन न्याय कायदा) या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसंच, या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी पोलिसांसह सर्वांनीच केली पाहिजे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिला.



शाळेच्या आवारात 100 यार्डांच्या परिसरात तंबाखू उत्पादनांच्या विक्रीस मनाई असली, तरी तंबाखू उत्पादने उघडपणे विकली जात आहेत. त्यामुळे गावात, स्थानिक आणि शहरी भागात तंबाखूच्या उत्पादनांची विक्री थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र

ज्या जागी पानबिडीचं दुकान असेल, तिथून त्या हेल्पलाईनवर कॉल केला तर, त्या जागी जाऊन चौकशी केली जाईल आणि कायद्यानुसार त्या विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असं ही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केलं.


७६ हजार ४८൦ शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित

अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने 'तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था' (टीएफआयआय) मार्गदर्शक तत्त्वाच्या अंमलबजावणीसाठी काम सुरू केले आहे. त्यानुसार, ७६ हजार ४८൦ शैक्षणिक शाळांना तंबाखूमुक्त घोषित करण्यात आलं आहे.


५२९ पेक्षा जास्त मुलं दररोज तंबाखूचं सेवन करतात

महाराष्ट्रात जवळपास ५२९ पेक्षा जास्त मुलं ही दररोज तंबाखू सेवनाला बळी पडतात. त्यामुळे, जर मुलांना शाळेच्या पातळीवर तंबाखूच्या वापरासंदर्भातील धोक्यांबद्दल जागरुक केलं तर, भविष्यात होणारी हानी टाळता येऊ शकते.


गॅट्स (ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वे) 2017 नुसार, भारतातील जवळपास 28.6% लोक तंबाखूचे सेवन करतात. त्यापैकी बहुतेक लोकांना तंबाखू सेवनाची सवय ही त्यांच्या बालपणात जडल्याचं स्पष्ट झालं आहे. 17 वर्षापासून ही सवय मुलांना जडू शकते. शिवाय, सिगारेटच्या पॅकेटवर दिलेली चेतावणी वाचूनही धूम्रपान करणाऱ्यांचं 61.9% एवढं प्रमाण जास्त आहे. त्यातील 53.8% लोकांनी तंबाखूचं व्यसन सोडण्याचा विचार केला. तर, 2009-10 मध्ये 38% सिगरेटचं व्यसन करणाऱ्यांपैकी 29.3% लोकांनी बिडी धूम्रपानाचा विचार सोडला होता.

डॉ. पंकज चतुर्वेदी, कर्करोगतज्ज्ञ, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल



हेही वाचा

लहान मुलं अडकली सिगारेटच्या विळख्यात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा