लोअर परळ - लहान मुलांसाठी काय महत्त्वपूर्ण आहे? याचा अभ्यास आपण केला आहे का, त्यांच्या दृष्टीने जग कसे असावे असे वाटते? या प्रश्नांची उकल करण्यासाठी 'बालपरिषद' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त सलाम बॉम्बे फाउंडेशन या संस्थेच्या वतीने शुक्रवारी लोअर परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शाळेच्या सभागृहात या बालपरिषदेचं आयोजन करण्यात आलं. यंदा मुलांनी तंबाखूचे दुष्परिणाम या विषयी चर्चा केली आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामामुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागणार याचा आढावा घेतला.
या बालपरिषदेत बृहन्मुंबई महापालिकेच्या 250 शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी डीसीपी एन्फोर्समेंट प्रवीण कुमार पाटील, महानगरपालिका सहाय्यक कार्यकारी वैद्यकीय अधिकारी निलम कदम, एफडीएचे जॉइंट कमिशनर चंद्रशेखर साळुंखे, एफडीएचे फूड सेफ्टी ऑफिसर डॉ. कृष्णा मेठेकर आणि मुंबईचे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर प्रकाश चराटे आदी मान्यवर उपस्थित होते.