Advertisement

Coronavirus update: संशयितांच्या हातावर शिक्के मारणार!

देशाबाहेरुन आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या हातावर निवडणुकीप्रमाणे शिक्के मारणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

Coronavirus update: संशयितांच्या हातावर शिक्के मारणार!
SHARES

देशाबाहेरुन आलेल्या नागरिकांपासून कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. या उपाययोजनेअंतर्गत देशाबाहेरुन आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या हातावर निवडणुकीप्रमाणे शिक्के मारणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे (State health minister Rajesh tope) म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्व तऱ्हेच्या उपाययोजना राज्य शासनाकडून करण्यात येत आहेत. राज्यभरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पण जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

राज्यातील सर्व शाळा-काॅलेज (school and colleges close) बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचसोबत १०-१२ वी च्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश देण्याच्या सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचा फैलाव झालेल्या ७ देशांतून जे नागरिक महाराष्ट्रात आले आहेत. त्यांना A, B, C अशा कॅटॅगरीमध्ये ठेवण्यात येणार आहे. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या प्रवाशांना A कॅटेगिरीनुसार वेगळं ठेवण्यात येईल. B मध्ये वयोवृद्ध आहे ज्यांना डायबिटीस, हायपर टेन्शन असणाऱ्या वयोवृद्धांना B कॅटेगिरीनुसार १४ दिवस कॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. या १४ दिवसांत जर त्यांच्यांत लक्षणे आढळली नाही, तर त्यांना घरी सोडण्यात येईल. तर C कॅटेगिरीत कोरोनाची लक्षणे आढळली नाही, परंतु ज्यांच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे, अशांना घरीच देखरेखेखाली ठेवण्यात येईल. अशा लोकांच्या हातावर निवडणुकीप्रमाणे शिक्का मारण्यात येईल. अशा लोकांनी घरात राहावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा