Advertisement

टीबीच्या रुग्णांना पुस्तकांचा आधार


टीबीच्या रुग्णांना पुस्तकांचा आधार
SHARES

आपलं काहीच आयुष्य नाही असं म्हणत रुग्णालयाच्या बेडला खिळलेल्या आणि मनाने खचलेल्या टीबी झालेल्या रुग्णांना मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुस्तकं भेट दिली.


FB_IMG_1531630951580.jpg

मुंबईतील सेंट झेर्वियस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी टीबी रुग्णालयातील रुग्णांना तब्बल ५०० पुस्तकं भेट म्हणून दिली. प्राध्यापक अवकाश जाधव यांच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी ही पुस्तकं भेट दिली. या पुस्तकांसोबतच लहान मुलांना काही भेटवस्तूही देण्यात आल्या.

FB_IMG_1531630946259.jpg

टीबी रुग्णांना त्यांच्या आयुष्यातील कठीण टप्प्यामध्ये हसत खेळत सामोरं जाण्याची ऊर्जा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललीतकुमार आनंदे यांनी दिली.

कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शारीरिक बळापेक्षा मानसिक बळ असणं सर्वात महत्त्वाचं असतं आणि हेच मनोबल आम्ही आमच्या रुग्णांना देतो. सतत आपल्याला आजार झाला आहे आणि आपण वाचू शकणार नाही, ही धारणा मनात ठेवली तर तो रुग्ण बरा होण्याची शक्यता फार कमी असते, म्हणूनच आम्ही रुग्णांना मानसिकदृष्ट्या प्रबळ करत आहोत.
डॉ. ललितकुमार आनंदे, वैद्यकीय अधीक्षक, टीबी रुग्णालय

टीबी रुग्णालय समूह शिवडी येथे टीबी रुग्णांच्या मनोरंजनासाठी खास जागा आहे. जिथे गाणी, संगीत आणि अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. रुग्णांच्या मनोरंजनासाठी म्युझिक शो, मॅजिक शो, पुस्तक वाचन सारखे अनेक उपक्रम घेतले जातात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा