Advertisement

कूपर रूग्णालयाच्या परिचारिकांची विलगीकरणाची मागणी


कूपर रूग्णालयाच्या परिचारिकांची विलगीकरणाची मागणी
SHARES
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रू. न. कूपर रुग्णालायमध्ये असलेल्या ८७ विद्यार्थीनी परिचारिकांनी विलगीकरण करण्याची मागणी केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे तातडीने विलगीकरण करायला हवे, अशी मागणी केली आहे.

या विद्यार्थिनींनी प्रशासनाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आक्षेपही घेतला आहे. अनेक रुग्णांच्या बाबतीत गोपनीयता पाळून ते पॉझिटीव्ह आहेत हे सांगितले जात नाही, त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार देणाऱ्या डॉक्टर तसेच परिचारिकांनाही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

कॅज्युअल्टीमध्ये आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी तो पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले, तर दुसऱ्या घटनेमध्ये ४ रुग्णांना ताप आला होता, रिपोर्ट येण्यापूर्वी या रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.

९ एप्रिल रोजी कूपर रुग्णालयाच्याच्या विविध विभागांमध्ये वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णाचा अहवालही पॉझिटीव्ह आला होता, त्यामुळे मेट्रन तसेच इतर संबधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही विद्यार्थिनी परिचारिकांची काळजी घ्यायला हवी, अशी मागणी केली आहे.

या क्षणी सर्वांनी एकत्रितपणे आणि जबाबदारीने काम करायला हवे, प्रत्येक रुग्णांची आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जात आहे. या परिचारिकांना क्वारन्टाइन करण्याची गरज वाटत नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पिनाकीन गुज्जर यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा