Advertisement

टाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आॅक्सिजन, बेडची कमतरता भासत आहे. आॅक्सिजनअभावी काहींचा बळीही गेला आहे. त्यामुळे आॅक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

टाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात
SHARES

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आॅक्सिजन, बेडची कमतरता भासत आहे. आॅक्सिजनअभावी काहींचा बळीही गेला आहे. त्यामुळे आॅक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर आता दिलासा मिळाला आहे. उद्योगपती रतन टाटा यांनी आॅक्सिजनची मोठी मदत केली आहे.  टाटा स्टीलने  २०० ते ३०० टन मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. टाटा स्टीलने ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

टाटा स्टीलने ट्विटमध्ये म्हटलं की, देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता २००-३०० टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.



हेही वाचा -

पश्चिम उपनगरातील 'हे' भाग ठरताहेत कोरोनाचा हॉटस्पॉट

  1. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा