Advertisement

ठाण्यात कोरोना लसीकरणासाठी आणखी १० केंद्रे

सर्वच केंद्रांवर ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस आणि आरोग्यसेवक लस घेण्यासाठी एकाच वेळी येत होते. त्यामुळे या केंद्रांवर गर्दी वाढली होती.

ठाण्यात कोरोना लसीकरणासाठी आणखी १० केंद्रे
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात  कोरोना लसीकरणासाठी आणखी दहा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत येथील लसीकरण केंद्राची संख्या आता २५ झाली आहे. लसीकरण केंद्रे वाढवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पालिका क्षेत्रात आधी १५ केंद्रांवर लस दिली जात होती. या सर्व ठिकाणी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येते. मागील तीन दिवसांपासून या सर्वच केंद्रांवर ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस आणि आरोग्यसेवक लस घेण्यासाठी एकाच वेळी येत होते. त्यामुळे या केंद्रांवर गर्दी वाढली होती. या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठांचे हाल होत होते. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. 

त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार शहरातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारपासून आणखी दहा नवीन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. तसंच सर्वच केंद्रांवर खुर्ची आणि पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्रे 

ठाणे शहरातील हाजुरी विलगीकरण कक्ष, सी. आर. वाडिया दवाखाना, ज्येष्ठ नागरिक सभागृह ढोकाळी नाका, बाळकुम पाडा क्रमांक १ मधील महापालिका शाळा क्रमांक ६०, ११२, ०४ ची इमारत, उथळसर आरोग्य केंद्र, आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्र, नौपाडा आरोग्य केंद्र, काजूवाडी आरोग्य केंद्र, सावरकरनगर आरोग्य केंद्र 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा