Advertisement

घरातील स्वच्छता, शारीरिक दुर्बलतेवर होणार पाहणी


घरातील स्वच्छता, शारीरिक दुर्बलतेवर होणार पाहणी
SHARES

भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर समस्यांही वाढतच अाहेत. या वाढत्या समस्या लक्षात घेत १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत केंद्र सरकारतर्फे देशभरातील घरांच्या स्वछतेची आणि लोकांमधील शारीरिक दुर्बलतेबाबत विशेष पाहणी होणार आहे.


काय आहे मोहीम

केंद्रीय कार्यक्रम अंमलबजावणी आणि सांख्यिकी मंत्रालयाद्वारे १ जुलै ते ३१ डिसेंबर या दरम्यान देशभरातील नागरिकांचं राहणीमान अाणि त्यांच्या अारोग्यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. या मोहिमेत पहिली पाहणी पिण्याच्या पाण्याच्या स्वछतेची आणि दुसरी पाहणी  अपंगत्वाबाबत होणार आहे. प्रत्येक घरात बेरोजगारीचं प्रमाण किती आहे याचीही पाहणी होईल. 


विशेष पाहणी मोहीम

विशेष पाहणी मोहिमेमध्ये दूषित पाणी आणि अपंगत्व यांची नेमकी कारणे, नागरी वस्ती आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, आर्थिक ताण या सर्व बाबींवर सविस्तरपणे विचार केला जाणार आहे.


विशेष प्रशिक्षण शिबीर

या मोहिमेत सामिल होण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयाने १९ जून ते २२ जून या कालावधीत नवी मुंबईतील बेलापुर येथे विभागीय प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे.



हेही वाचा -

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच

औषध दुकानदारांना जेनेरिक औषधांची सक्ती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा