सावधान! डेंग्यू वेगाने पसरतोय

  Pali Hill
  सावधान! डेंग्यू वेगाने पसरतोय
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईतील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी 1 ते 25 सप्टेंबरपर्यंत मुुंबईत 296 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. तर 30 जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असून, त्यांच्यावर विविध रुग्णांवर महापालिका,शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्यावर्षी याच महिन्यात डेंग्यू आणि लेप्टोचे अनुक्रमे २४८ आणि २६ रुग्ण आढळले होते. तर यंदा सप्टेंबरच्या २५ दिवसांत डेंग्यूचे संशयित आणि डेंग्यूसदृश तापाचे तब्बल तीन हजार २८७ रुग्ण आढळले आहेत. तसेच हेपेटायटिसचे १०८ रुग्ण आढळले आहेत.
  यादरम्यान, डेंग्यू, लेप्टोवर उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  वयानुसार डेंग्यूचे पुरुष आणि महिला रुग्ण ( १ ते २५ सप्टेंबरपर्यंत)

  वय ०-14 :- पुरुष - 35, महिला - 17

  वय 15-29 :- पुरुष -155, महिला - 38

  वय 30-44 :- पुरुष - 28, महिला - 15

  वय 45-59 :- पुरुष -06, महिला - 00

  वय 60 :- वर्षांवरील, पुरुष - 01, महिला - 1

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.