Advertisement

रिलायन्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली दुर्मिळ शस्त्रक्रिया


रिलायन्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली दुर्मिळ शस्त्रक्रिया
SHARES

सर.एच.एच.रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया केली आहे. एका 10 वर्षाच्या मुलावर थोरॅको अॅबडॉमिनल एऑर्टिक अॅन्यूरिझम (टीएएए) रिपेअर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

अंधरीत राहणाऱ्या ओमला वयाच्या 10 व्या वर्षीच सततची डोकेदुखी आणि अतिरक्तदाबाचा त्रास जडला होता. अनेक उपचार करुनही ओमला काही फरक पडत नव्हता. त्यांनी अंधेरीतील एका डॉक्टरकडे जावून ओमचं सिटी स्कॅन केलं. तेव्हा त्याच्या हृदयाच्या झडपेला सूज आल्याचं निदान झालं. त्या डॉक्टरांनी त्याच्या पुढील उपचारांसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

ओमला झालेला आजार हा वयाची चाळीशी पूर्ण झालेल्या व्यक्तींना होऊ शकतो. ओमच्या बऱ्याच चाचण्या केल्यानंतर त्याच्या शरीराच्या रक्तदाबामध्ये फरक आढळून आला. म्हणजेच काखेत त्याचा रक्तदाब २००/१२० होता, तर पायात ९०/७० होता. अधिक तपासणी केली असता त्याला थोरॅकोअॅबडॉमिनल महाधमनीमध्ये विस्तृतवाहिनीचे विस्फारण (अॅन्यूरिस्मल डायलेशन) झाल्याचं निदान झालं. ही परिस्थिती अत्यंत दुर्मिळ, गुंतागुंतीची आणि घातक असते, जी शरीरातील महाधमनीवर परिणाम करते, यावर टीएएए ओपन शस्त्रक्रिया हा एकच उपचार आहे. या शस्त्रक्रियेमध्ये 25% रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो.  

काय आहे हा आजार?

या आजारात महाधमनीचे विस्फारीकरण म्हणजे महाधमनीमध्ये आलेला गोळा किंवा सूज असते. या विस्फारीकरणात विविध अंतर्गत अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्यांचा समावेश असतो. विस्फारीकरणामध्ये हळुहळू वाढ होते, त्यावर उपचार न केल्यास जेव्हा त्याचा एक विशिष्ट आकार होतो तेव्हा ते फाटते आणि अकस्मात मृत्यूसुद्धा होऊ शकतो.      

ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. कारण अॅबडॉमिनल महाधमनीचे विस्फारण हे मुलांमध्ये अत्यंत दुर्मिळ असते. ओमला झालेल्या संसर्गामुळे त्याच्या महाधमनीचे पटल कमकुवत झाले होते आणि त्यामुळे ते विस्फारले होते. महाधमनीचा आकार मोठा झाला होता आणि ती कोणत्याही क्षणी फाटली असती. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असता. त्यामुळे तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला.पण, आता ओम पूर्णपणे बरा झाला आहे. 

डॉ. बिपीनचंद्र भामरे, सल्लागार हृदयविकार शल्यविशारद


थोरॅकोअॅबडॉमिनल एऑर्टिक सिस्टिम अॅन्युरिझमची दुरुस्ती ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत छाती आणि पोट उघडून महाधमनीच्या विस्फारणावर पॉलिएस्टरपासून तयार करण्यात आलेल्या विशेष ग्राफ्टचा वापर करून उपचार करण्यात येतात. असंही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केलं .

कशी करतात ही शस्त्रक्रिया?

रुग्णाच्या छातीची डावी बाजू आणि पोटाची मध्य रेषा एक मोठा छेद देऊन उघडली जाते. सुमारे २० सेंटीमीटर महाधमनीच्या जागी पॉलिएस्टर ग्राफ्ट बसवण्यात येतो. मूत्रपिंडाकडे जाणाऱ्या रक्त वाहिन्यांचे ट्युब ग्राफ्टमध्ये प्रत्यारोपण करण्यात येतं. त्याचप्रमाणे लहान आणि मोठ्या आतड्याला तसंच यकृताच्या प्लीहाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचं ग्राफ्टमध्ये प्रत्यारोपण करण्यात येतं. म्हणजे छातीच्या खालील अर्ध्या अवयवांना रक्तपुरवठा करणारी नवी महाधमनी बसवण्यासारखेच होते.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा