महिलेने दिला तिळ्यांना जन्म

 Chembur
महिलेने दिला तिळ्यांना जन्म

चेंबूर - येथील साई रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलींना जन्म दिला.

चिता कॅम्प, ट्रॉम्बे येथे राहणारे हर्षद खान यांची पत्नी समीना खान ह्या गरोदर होत्या. त्यांना शनिवारी सकाळी त्रास होऊ लागला. म्हणून त्यांच्या पतीने समिना यांना चेंबूर येथील साई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांनी या तीन मुलींना जन्म दिला. तीनही नवजात मुली आणि त्यांची आई सुखरूप असून, या तिळ्या बाळांना पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी झाली होती.

Loading Comments