Advertisement

मालाडमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन


मालाडमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन
SHARES

मालाड - अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले भारतातील पहिलेच सुपर स्पेशालिटी तुंगा हे रुग्णालय मालाडमध्ये बांधण्यात आलं आहे. स्मूथ सर्जरीसाठी लॅप्रोसक्रोपी कॅमेरा सिस्टम आयरिश ही आधुनिक तंत्रज्ञान या रुग्णालयात उपलब्ध आहे. 160 खाटांच्या या रुग्णालयात मीरारोड, बोईसर, येथेही शाखा आहेत. आधुनिक जीवनपद्धतीत आज मोठ्या प्रमाणात जीवघेणे आजार वाढत आहेत. त्यासाठी अशा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उत्तर मुंबईत मोठी गरज होती अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात आपण रुग्णांवर उपचार करणार असल्याचे या रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेश शेट्टी यांनी सांगितले. या रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा