Advertisement

'तरच कोरोना पसरणार नाही', पंकजा मुंडेंची वर्क फ्रॉम होमची मागणी

राज्यातील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता पंकजा मुंडेंनी सरकारडे वर्क फ्रॉम होमची मागणी केली आहे. अशा प्रकारे कोरोना पसरण्यापासून रोखता येईल असं पंकजा ताईंचं म्हणणं आहे. तुम्हाला कसी वाटली त्यांची आयडिया?

'तरच कोरोना पसरणार नाही', पंकजा मुंडेंची वर्क फ्रॉम होमची मागणी
SHARES

चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आता भारतासह जगभरात थैमान घालत आहे. भारतात देखील ४० पेक्षा अधिक जणांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाव्हायरस (Coronavirus) धडकल्यानंतर सर्वांनीच त्याची धास्ती घेतली आहे. पुण्यात (Pune) कोरोनाव्हायरसचे ५ रुग्ण आढळलेत. त्यामुळे काळजी वाढली आहे


पंकजांची 'ही' मागणी

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी वर्क फ्रॉम होम (Work form home) म्हणजे घरूनच काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी केली आहे. राज्यातील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे.वर्क फ्रॉम होम

ट्विटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, "कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी फक्त मास्क वापरणं आणि तापमानावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. शक्य असल्यास लोकांना घरातूनच ऑफिसचं काम करण्याची मुभा द्यायला हवी, तसंच परीक्षा वगळता शाळा आणि कॉलेजही बंद ठेवावेत, जेणेकरून कोरोनाव्हायरस जास्त पसरणार नाही. कमी लोकं घराबाहेर पडतील आणि परिस्थितीही योग्यरित्या हाताळता येईल"


'या' टोल फ्रीवर करा कॉल

दरम्यान पुण्यात कोरोनाव्हायरसचे ५ रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे, तर तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांसाठी १०४ टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोरोना संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष आणि राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 यावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

सध्या भारतात, जम्मू-काश्मीर १, लडाख २, राजस्थान १७, दिल्ली ४, महाराष्ट्र ५, यूपी ८, कर्नाटक ८, केरळ १७, तमिळनाडू १ आणि तेलंगणामध्ये १ अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.


हेही वाचा

Coronavirus Update: आजारी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज नाही, शिक्षण विभागाची सूचना

कोरोनाचा संसर्ग झालेल्या चालकांना उबर देणार भरपाई, पण...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा