Advertisement

कोरोनाचा संसर्ग झालेल्या चालकांना उबर देणार भरपाई, पण...

कॅब सर्व्हिस कंपनी उबरनं घोषणा केली आहे की, चालकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यास त्याला भरपाई देण्यात येईल. पण त्यांच्या काही अटी आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या चालकांना उबर देणार भरपाई, पण...
SHARES

चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस (CoronaVirus) आता भारतासह जगभरात थैमान घालत आहे. भारतात देखील ४० पेक्षा अधिक जणांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यात मुंबईतल्या (Mumbai) एका ओला (Uber) चालकाला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता कॅब सर्व्हिस कंपनी उबरनं घोषणा केली आहे की, चालकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यास त्याला भरपाई देण्यात येईल


उबर देणार भरपाई

उबरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, जगभरात हे लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे चालक कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे अथवा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना वॉर्डमध्ये ठेवल्याचे कागद दाखवतील, त्यांना १४ दिवसांपर्यंत भरपाई देण्यात येईलआता हा नियम सगळीकडे लागू करण्यात आली नाही. पण लवकरच या नियमाची अमलबजावणी सगळ्या देशांमध्ये होईल.  


काळजी घेणं आवश्यक

उबरनंतर अन्य टॅक्सी शेअर आणि डिलिव्हरी कंपन्यांनी देखील संकेत दिले आहेत की ते देखील असेच पाऊल उचलू शकतात. भारतात देखील या व्हायरसचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे. भारतातील नागरिक साफ-सफाई, स्वच्छतेबाबत अधिक जागृक नसल्यानं या व्हायरसचा धोका भारतात अधिक आहे. त्यामुळे उबर-ओला सारख्या सेवा वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे.


चालक नकार देऊ शकतात

याशिवाय कोरोना रुग्ण असल्याचा संशय असल्यास उबर चालक राइडसाठी नकार देऊ शकतात. साधारण राइड रद्द करण्याचा अधिकार हा उबर प्रवाशांचा असतो. चालकानं असं केल्यास त्याला भुर्दंड भरावा लागतो. पण आता कोरोनाच्या भितीनं उबरनं चालकाला राइड रद्द करण्याची परवानगी दिली आहे.  


कॅबमधून दररोज अनेक प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे कारमधील अनेक गोष्टींना स्पर्श होत असतो. याच कारणामुळे चालक आणि इतर प्रवाशांना व्हायरसचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. अशा परिस्थिती विशेष काळजी घेण्याची गरज आहे.



हेही वाचा

'कोरोना'चे सहा प्रवासी मुंबईतील कस्तुरबामध्ये दाखल

Coronavirus Update: मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा