Advertisement

मुंबईत स्वाईन फ्ल्यूचंही संकट, १२ रुग्ण आढळले

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना आता मुंबईत साथीच्या आजारांनी आता डोकं वर काढलं आहे. ताप, खोकला, सर्दी, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत.

मुंबईत स्वाईन फ्ल्यूचंही संकट, १२ रुग्ण आढळले
SHARES

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना आता मुंबईत साथीच्या आजारांनी आता डोकं वर काढलं आहे. ताप, खोकला, सर्दी, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत.  मुंबईच्या सहा वॉर्डांमध्ये स्वाईन फ्लूचे १२ रुग्ण आढळले आहेत. पालिका आरोग्य विभागाने सावधिगिरी बाळगण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये जुलैमध्ये स्वाईन फ्लूचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनाकोरोनाबरोबर साथीच्या आजारांचाही सामना करावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या मलबार हिल, ताडदेव, ग्रँटरोड, वरळी (जी दक्षिण), अंधेरी-पूर्व (के/पूर्व), अंधेरी-पश्चिम (के/पश्चिम), गोरेगाव (पी-दक्षिण) व मुलुंड (टी वॉर्ड) या वॉर्डमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 

मागील वर्षी जुलै २०२० मध्ये स्वाईन फ्लूचा एकच रुग्ण आढळला होता. पण यंदा ११ दिवसात स्वाइन फ्लूचे १२ रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पाणी उकळून पिणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे असे आवाहन पालिका आरोग्य विभागाने केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा