Advertisement

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOचे ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाचे पुढील अध्यक्ष होणार आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
SHARES

कोरोनानं जगभरात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सर्वात जास्त रुग्ण हे मुंबईत आढळत आहेत. त्यात अजून यावर कुठलीच लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे चिंतेचं आणि नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. यातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOचे ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाचे पुढील अध्यक्ष होणार आहेत. यामुळे भारताचं नाव अधिक उंचावलं जाईल.

१९४ देशांच्या जागतिक आरोग्य महासभेनं मंगळवारी भारताला कार्यकारी मंडळावर नेमण्याच्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती आहे. सध्या जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे वर्तमान अध्यक्ष आहेत. डॉ. हर्षवर्धन हे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडून २२ मे रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. २२ मे रोजी होणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हर्षवर्धन यांची औपचारिक निवड केली जाईल.

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, बोर्डाचे अध्यक्षपद अनेक देशातील वेगवेगळ्या ग्रुपमध्ये एक-एक वर्षांसाठी दिले जाते. यावर्षी भारताकडे हे पद दिलं जाण्याचं मागच्या वर्षीच ठरलं होतं. हर्षवर्धन कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद सांभाळतील. ही मीटिंग वर्षातून दोनवेळा होते. पहिली जानेवारी आणि दुसरी मीटिंग मे महिन्यात होईल.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा