Advertisement

आदिवासी बांधवांसाठी येऊर गाव येथे ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण केंद्र

ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसंच उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण सुरू करण्यात आलं आहे.

आदिवासी बांधवांसाठी येऊर गाव येथे ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण केंद्र
SHARES

ठाणे महापालिकेच्यावतीने (thane municipal corporation) सुरू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत ऑनलाईन नोंदणीपासून वंचित असणाऱ्या तसंच लसीकरणासाठी शहरात ये-जा करणं सहज शक्य नसणाऱ्या आदिवासी (tribals) पाड्यातील बांधवांसाठी येऊर गाव (Yeoor village) येथे कोरोना लसीकरण केंद्र (corona vaccination center) सुरू करण्यात येणार आहे. 

आदिवासी बांधवांचं (tribals) लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी हे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. येऊर गाव येथील पाटीलवाडी महापालिका शाळेजवळील आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक ४ जून २०२१ पासून सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसंच उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणीकृत तसेच  'वॉक इन' पद्धतीने नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणीपासून आदिवासी पाड्यातील नागरिक वंचित राहिले आहे. लसीकरणासाठी त्यांना शहरात येणे सहज शक्य नाही. तसंच लसीकरणाबाबत त्यांच्या मनात गैरसमज होता. हा गैरसमज आरोग्य विभागाच्यावतीने दूर करण्यात आला असून या सर्व आदिवासी बांधवाना प्राधान्याने लस देण्याचा  निर्णय पालिकेने घेतला आहे. 

दरम्यान, पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांवरील दिव्यांग आणि स्तनदा माता यांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागणार नाही, अशी माहिती पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली. संबंधितांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेने केलं आहे.

दरम्यान, ठाणे (thane) जिल्ह्यातील शहरी भागांपाठोपाठ आता ग्रामीण भागांमध्येही करोनाचा संसर्ग ओसरू लागला असून जिल्ह्य़ातील  अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील ४३१ गावांपैकी ११९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. या सर्वच गावांमध्ये गेल्या २८ दिवसांत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या ११५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये अंबरनाथमधील ११७, कल्याणमधील २९१, भिवंडीमधील ३०८, शहापूरमधील ३७८ आणि मुरबाडमधील ६२ रुग्णांचा समावेश आहे.



हेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा