Advertisement

वसई-विरारमध्ये 'ह्या' विभागात १४ दिवसांचा कडक लाॅकडाऊन

वसई, नालासोपारा आणि विरार पूर्वेकडील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या भागांचा यामध्ये समावेश आहे.

वसई-विरारमध्ये 'ह्या' विभागात १४ दिवसांचा कडक लाॅकडाऊन
SHARES

वसई-विरार महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे महापालिकेने पालिकेने ५ प्रभागात १४ दिवसांचा कडक लाॅकडाऊन (टाळेबंदी) लागू केला आहे. वसई, नालासोपारा आणि विरार पूर्वेकडील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या भागांचा यामध्ये समावेश आहे. 

वसई-विरार शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आता  दोन हजारांच्या आसपास गेला आहे. सर्वाधिक रुग्ण हे शहराच्या पूर्वेकडील चाळींच्या परिसरात आहेत. येथे मृत्यूंचं प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कडक लाॅकडाऊनसाठी महापालिकेने  पूर्वेकडील अतिसंवेदनशील परिसर निश्चित केले आहेत. या ठिकाणी  १८ जूनपासून कडक लाॅकडाऊन लागू केला आहे. 

अत्यावश्यक सेवा वगळता येथील सर्व व्यवहार बंद केले आहेत.  वसई पूर्वेकडील वालीव, तुंगारफाटा, फादरवाडी, नालासोपारा पूर्वेकडील गालानगर, शिर्डीनगर, संतोष भुवन, वालई पाडा, वाकण पाडा, वसई फाटा, विरारमधील गांधी चौक, सहकारनगर आदी भागांमध्ये लाॅकडाऊन आहे.


लाॅकडाऊन लागू केलेले विभाग

 - प्रभाग समिती सी  - चंदनसार

- गांधी चौक विरार पूर्व ( गांधी चौक ते जनकधामपूपर्यंत)

- सहकारनगर (विठुरमाळी कंपाऊंड ते मथुरा डेअरी)

- प्रभाग समिती    एफ - धानीव-पेल्हार

- श्रीरामनगर गेट नंबर १ ते डोंगपाडा रोड

-  धानीवबाग नाका ते वेलकम डेअरी

-  संतोष भुवन

-  वालईपाडा

- वाकणपाडा

-  वसई फाटा येथील इंदिरा वसाहत, मिल्लतनगर

-  प्रभाग समिती   डी- आचोळे

- गालानगर (लक्ष्मण अपार्टमेंट ते आनंद वैभव इमारत)

- शिर्डीनगर (सीमा इमारत ते ख्रिस्तराज अपार्टमेंट)

-  प्रभाग समिती   जी- वालीव

- तुंगार फाटा ते बाप्पा सीताराम मंदिरापर्यंत

-  फादरवाडी नाका ते विद्यविकासिनी शाळा

- गणेश माळी यांचे घर ते भगत कंपाऊंड



हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा