आरोग्य सांभाळा, मधुमेह टाळा

  मुंबई  -  

  वरळी - तुम्ही मधुमेहाने त्रस्त आहात ? मग गरज आहे काळजी घेण्याची. मधुमेहाचा धोका कोणत्याही वयात उद्धभवू शकतो. हेच लक्षात घेऊन वरळीच्या जिजामातानगर इथल्या महापालिका शाळेत रविवारी मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिडसिटीच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 2014च्या आकडेवारीनुसार भारतात तब्बल 42 कोटी मधुमेही आहेत. हा आकडा

  ऐकून बसला ना धक्का... याला कारण आहे ती आपली बदलती जीवनशैली आणि राहणीमान.

  मधुमेह का होतो ?

  अनियमित आहार
  व्यायामाचा अभाव
  अतिलठ्ठपणा
  अनुवंशिकता
  ताणतणाव
  गोड पदार्थांचे अतिसेवन

  काय आहेत मधुमेहाची लक्षणे?

  वारंवार लघवी होणे
  जखम लवकर न भरणे
  चक्कर येणे
  हातापायांना मुंग्या येणे

  मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय?

  जीवनशैलीत बदल करावा
  नियमित आहार घ्यावा
  औषधे नियमित घ्यावीत
  नियमित रक्त तपासणी करावी
  वजनावर नियंत्रण आवश्यक
  नियमित योग आणि व्यायाम करावा
  रोज 15-20 मिनिटे चालावे
  फास्ट फूड, जंक फूड टाळा
  धुम्रपान,गुटखा,मद्यपानाचे सेवन टाळावे

  काय आणि कसा आहार घ्याल? 

  पालेभाज्या
  कडधान्ये
  भाजी आणि नाचणी, ज्वारीची भाकरी
  उपमा
  दुध, दही, डाळी
  फळे, केळी. चिकू अशी जास्त गोड फळे टाळावीत
  मांसाहाराचे सेवन कमी प्रमाणात करावे
  गोड आणि स्निग्ध पदार्ध टाळावेत

  जर तुम्ही ही काळजी घेतली तर मधुमेहा ऐवजी जीवन मधुर होण्यास नक्की मदत होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.