Advertisement

गुलाबी थंडीत गुलाबी धाव


SHARES

वांद्रे - पिंकथॉन वुमेन मॅरेथॅानचं आयोजन रविवारी वांद्रा इथल्या एमएमआरडीए मैदानावर करण्यात आलं होतं. सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान गुलाबी थंडीत ही मॅरेथॅान झाली.
यामध्ये 5 वर्षांच्या मुलींपासून 70 वर्षांपर्यंतच्या महिलांनी सहभाग घेतला होता. ही मॅरेथॉन तीन टप्प्यांमध्ये पार पडली. या वेळी कलर्स चॅनलचे सीईओ राज नायक तसंच मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण देखील उपस्थित होता. यामध्ये मुंबई तसंच मुंबई बाहेरील महिलांनी सहभाग घेतला. तर पुण्यातून आलेल्या काही महिला नऊवारी साडीत दिसल्या. या मॅरेथॅानच्या माध्यमातून महिलांना ब्रेस्ट कॅंसरबद्दल जागरुक राहाणे, आरोग्यदायी जीवन जगा असा संदेशही देण्यात आला. या वेळी गितीमंद आणि दिव्यांग मुलींनीही यात सहभाग नोंदवला. यासह मुंबईतील खासगी, महापालिका शाळेतील विद्यार्थिनी आणि महिला पोलिसही सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात गाण्यांच्या तालावर महिलांना व्यायामाचे धडेही देण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा