Advertisement

भारतात उपलब्ध 'या' लसी किती प्रभावशाली? जाणून घ्या एकूण एक माहिती

भारतात एकूण किती लस आहेत? त्या किती प्रभावशाली आहेत. त्याच्या किंमती किती? त्यांचे डोस किती अंतरानंतर घ्यायचे? याची सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळेल.

भारतात उपलब्ध 'या' लसी किती प्रभावशाली? जाणून घ्या एकूण एक माहिती
SHARES

कोरोनाचा सामना करण्यासाठी व्यापक पातळीवर लसीकरणाचा निर्णय घेत सरकारनं आता देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाचा निर्णय घेतलाय. सध्या भारतात कोवॅक्सिन (covaxin) आणि कोविशिल्ड (covishield) दिली जात आहे. आता स्पुतनिक (Sputnik V)चा पर्याय देखील लवकरच उपलब्ध होईल.

भारतात एकूण किती लस आहेत? त्या किती प्रभावशाली आहेत. त्याच्या किंमती किती? त्यांचे डोस किती अंतरानंतर घ्यायचे? याची सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळेल.  


1) कोव्हॅक्सिन

स्वदेशी लस कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादची कंपनी भारत बायोटेक ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या मदतीनं करत आहे. भारतात या लसीच्या आपत्कालीन वापराला ३ जानेवारीला मंजुरी मिळाली होती.

भारतात या लसीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली असली तरी या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सध्या सुरू आहेत. मृत कोरोना विषाणूपासून ही लस बनवण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या दाव्यानुसार ही लस कोविशिल्ड इतकीच प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय.

  • किती प्रभावी

भारतीय कोवॅक्सिन लस ही जगातील कोरोनाच्या ६१७ प्रकारांच्या व्हेरिएंटना किंवा म्युटंटवर प्रभावी असल्याची चर्चा आहे. कोवॅक्सिनची परिणामकारकता आतापर्यंत ७८ टक्के असल्याचं समोर आलंय. कोरोना रुग्णांबाबत या लसीची परिणामकारकता १०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

  • दोन डोसमध्ये किती अंतर?

कोवॅक्सिन लस घेतल्यास पहिल्या डोसनंतर ४ ते ६ आठवड्यांच्या आत दुसरा डोस घेणं महत्त्वाचं आहे.

  • किंमत

सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालय या दोन्हींसाठी कोरोना लसीसाठी मोजाव्या लागणाऱ्या किमती वेगळ्या आहेत. कोवॅक्सिनच्या एका डोससाठी राज्यांना 600 रुपयांना आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांना मिळणार आहे.


2) कोव्हिशिल्ड

कोविशिल्ड ही लस सध्या आपल्याकडे दिली जात आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट सध्या या लसीचं उत्पादन करत आहे.

  • किती प्रभावी

लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर वाढवलं तर ही लस ७० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. मात्र, भारतात ज्या पद्धतीनं पहिल्या डोसनंतर २८ दिवसानं दुसरा डोस दिला जातो, त्यात ही लस ५५ टक्के प्रभावी ठरते.

  • दोन डोसमध्ये किती अंतर?

सुरुवातीला डोन डोसमध्ये ४ ते १२ आठवड्याचं अंतर ठेवलं होतं. पण आता २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला जात आहे.

  • किंमत

नुकतंच सिरमनं कोविशिल्डच्या किंमती वाढवल्या आहेत. १ मेपासून खाजगी रुग्णालयात कोविशिल्ड ४०० रुपयांना खाजगी रुग्णालयात ६०० रुपयात उपलब्ध होणार आहे. तुर्तास सरकारी रुग्णालयात २५० रुपयाला ही लस उपलब्ध आहे.


3) रशियाची स्पुतनिक व्ही

रशियाची स्पुतनिक या लसीला नुकतीच भारत सरकारनं मंजुरी दिली आहे. १ मे ला याचा पहिला साठा भारतात येऊ शकतो.

  • किती प्रभावी?

स्पुतनिक व्ही ही लस कोरोनाविरुद्ध तब्बल ९२ टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. मृत कोरोना विषाणूला शरीरात पाठवण्यासाठी वाहक म्हणून सर्दीचा विषाणू वापरण्यात आला आहे. मात्र, त्यात असे बदल केले गेले आहेत, की ज्यामुळे माणसांना काहीही आजार होणार नाहीत.

  • दोन डोसमध्ये किती अंतर?

इतर लसींपेक्षा स्पुतनिक व्ही लसीचे खुराक वेगवेगळे आहेत. खुराक वेगवेगळे म्हणजे, पहिली लस आणि दुसरी लस ही पूर्णपणे वेगळी आहे. पहिल्या लसीच्या डोसच्या २१ दिवसांनंतर स्पुतनिक व्ही चा दुसरा डोस दिला जातो.

  • किंमत

भारतात डॉ. रेड्डी लॅब नागरिकांना ही लस देणार आहे. त्यांच्यानुसार अजून त्यांनी लसीची किंमत अद्याप ठरवली नाही. पण या लसीची किंमत ७५० असू शकते अशी चर्चा आहे.हेही वाचा

लक्षणांवरून COVID झालाय की SARI हे कसं ओळखाल?

कोरोनाविरोधात लढा देण्यास घरगुती उपाय किती प्रभावशाली?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा