Advertisement

कोरोनाची तिसरी लाट आली, WHOकडून इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनंच कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आली, WHOकडून इशारा
SHARES

जागतिक आरोग्य संघटनेनंच (World health organisation) कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा केली आहे. डब्ल्यूएचओनं (WHO) जगात तिसऱ्या कोरोना लाटेची सुरुवात झाल्याचं सांगितलं आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत, असं सांगत सर्व देशांना अलर्ट केलं आहे.

डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी सांगितलं, कोरोनाव्हायरस सातत्यानं स्वतःमध्ये बदल करत आहे. सोबतच तो अधिक संसर्गजन्यही होतो आहे. डेल्टा व्हेरिएंट आता १११ पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. लवकरच हा जगभर पसरू शकतो. अल्फा व्हेरिएंट १७८ देशांत आहे. तर बिटा आणि गामा व्हेरिएंट अनुक्रमे १२३ आणि ७५ देशांमध्ये दिसून आला आहे.

भारतात पहिल्या दोन लाटांचं स्वरूप पाहता तिसरी लाट येणं अटळ असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दुसऱी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमध्ये ज्या प्रकारची बेफिकिरी दिसत आहे, ती चिंताजनक आहे.

UBS सिक्युरिटज इंडियाच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ तज्ज्ञ तन्वी गुप्ता जैन यांच्या मते, भारतात तीन मुख्य कारणांमुळेच तिसऱ्या लाटेचा मोठा धोका आहे. जैन म्हणाल्या, बहुतेक राज्यांमध्ये नियम शिथील केले जात आहेत. आर्थिक व्यवहार खुले केले जात आहेत आणि लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक वाढला आहे.

दरम्यान, हेद्राबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र तज्ज्ञांनी तिसरी लाट ४ जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसात मृत्युंचा आकडा वाढला आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या निष्कर्षावर आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.



हेही वाचा

गुरुवारपासून गर्भवती महिलांचं लसीकरण, 'या' ३५ रुग्णालयांमध्ये होणार लसीकरण

परदेशात जाणारे विद्यार्थी, खेळाडू, कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत ७ ठिकाणी लसीकरण केंद्र

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा