Advertisement

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची 'ही' मागणी WHOनं नाकारली

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं जागतिक आरोग्य संघटनेकडे कोविशिल्ड लशीची शेल्फ (Covishield shelf life) लाइफ वाढवण्यासाठी अर्ज केला होता.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची 'ही' मागणी WHOनं नाकारली
SHARES

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Pune serum institute of India) कोविशिल्ड (Covishield) ही लस तयार केली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford universtity) आणि अॅस्ट्राझेनका (AstraZeneca) कंपनीच्या मदतीनं ही लस तयार करण्यात आलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोविशिल्डबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं जागतिक आरोग्य संघटनेकडे कोविशिल्ड लशीची शेल्फ (Covishield shelf life) लाइफ वाढवण्यासाठी अर्ज केला होता. शेल्फ लाइफ म्हणजे लस उत्पादित झाल्यापासून किती काळापर्यंत वापरता येऊ शकता ती मुदत. या कालावधीपुरती लशीचा प्रभाव टिकून राहतो आणि ती वापरण्यासाठी सुरक्षित असते. सध्या कोविशिल्डची शेल्फ लाइफ सहा महिने आहे. ती नऊ महिन्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी सीरमनं डब्लूएचओकडे केली होती.

पण WHO ने सीरमची ही मागणी फेटाळली आहे. कोविशिल्ड लशीची शेल्फ लाइफ सहा महिन्यांवरून नऊ महिन्यांपर्यंत वाढवण्यास जागतिक आरोग्य संघटनेनं नकार दिला आहे. पीटीआयनं याबाबत ट्वीट केलं आहे.

अनेक देशांमध्ये अॅस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीचा वापर तात्पुरता थांबवला आहे. ही लस घेतलेल्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचं दिसून आलं आहे. काही जणांचा यानंतर मृत्यूही झाला आहे. अॅस्ट्राझेनकाची लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं यामध्ये संबंध असू शकतो अशी शक्यता युरोपियन वैद्यकीय नियामकांनी वर्तवली आहे. पण तरी या लशीचे दुष्परिणामापेक्षा फायदे अधिक असल्यावरही जोर देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत अधिक अभ्यास सुरू आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा