FDAच्या रडावर आता विनटेक औषध कंपनी

 Pali Hill
FDAच्या रडावर आता विनटेक औषध कंपनी

मुंबई - एफडीएच्या रडावर आता विनटेक औषध कंपनी आलीय. मे. विनटेक औषध कंपनी ही विनापरवाना नाशिकमध्ये औषधांचे उत्पादन करत असल्याचे एफडीएच्या कारवाईतून स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्य़ात आलीय. एफडीएच्या मुंबईतील मुख्यालयातील दक्षता विभागातील अधिकार्यांनी थेट नाशिकमध्ये धाव घेत या कंपनीची तपासणी केली. यावेळी विना परवाना औषध उत्पादनाबरोबरच, औषधांची चाचणी पूर्ण होण्याआधीच औषधांची विक्री केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.. महत्त्वाचे म्हणजे औषधांची चाचणी करण्यासाठी सक्षम व्यक्तीही नसल्याचे कारवाईत दिसून आलंय. एकूणच ही कंपनी औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याचा भंग करत असल्याचे निष्पन्न झाल्याने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. बीडीएचप्रमाणे आता या कंपनीविरोधातही कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Loading Comments