Advertisement

जे.जे रुग्णालयात महिलेने दिला 4 बाळांना जन्म


जे.जे रुग्णालयात महिलेने दिला 4 बाळांना जन्म
SHARES

मुंबईतील जे.जे. रुग्णालयात एका महिलेने एकाचवेळी 4 बाळांना जन्म दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, देशात 7 लाख गरोदर महिलांमध्ये एका महिलेच्या गर्भात एकामध्ये अधिक बाळं असतात. पण, यामुळे घाबरून न जाता योग्य पद्धतीने उपचार केल्यास कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते.

जहानरा शेख (29) असं या महिलेचं नाव असून ती मुळची नाशिकची आहे. तिने एका मुलाला, तर तीन मुलींना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती झाल्यानंतर जहानराला स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. प्रसूतीनंतर तब्बल एक महिना जहानरा रुग्णालयात होत्या. पण, रविवारी जहानराला डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं.



जहानरा शेखचं 6 व्या महिन्यात करण्यात आलेल्या सोनोग्राफीत पोटात चार गर्भ असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. त्यानंतर जून महिन्यात मुंबईच्या जे.जे रुग्णालयात ती दाखल झाली.

ही महिला नाशिकहून मुंबईत आली होती. प्रवासात धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तिला तीन महिने रुग्णालयातच ठेवण्यात आलं. तिची प्रसूती सुखरूप झाली असून आई आणि चारही मुलं व्यवस्थित आहेत. त्यांना नुकताच डिस्चार्जही देण्यात आला आहे.

डॉ. प्रिती लुईस, स्त्रीरोगतज्ज्ञ

जहानराच्या मुलाचं वजन 2किलो ग्रॅम, पहिल्या मुलीचं वजन 1.9 किलो, दुसरी मुलगी 1.8 किलो आणि तिसऱ्या मुलीचं वजन सुद्धा 1.8 किलो होतं. त्यामुळे, अशा प्रकारे चार मुलं होण्याची ही घटना फारच दुर्मिळ आहे.

लग्नानंतर सहा वर्षांनी पत्नी गरोदर राहिली होती. त्यातही तिच्या जीवाला धोका असल्याने मनात भिती होती. पण देवाच्या कृपाने पत्नी व मुलं सर्व सुखरूप आहेत.

नाझीम शेख, जहानरा शेखचे पती




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा