Advertisement

स्त्रियांना अॅनिमियाचा जास्त धोका


स्त्रियांना अॅनिमियाचा जास्त धोका
SHARES

अॅनिमिया म्हणजेच पंडुरोग (शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होणे) या आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मंगळवारी ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स अँड गायनाकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’ (एफओजीएसआय) आणि ‘एमक्युअर फार्मासुटिकल्स’च्या वतीने देशातील एकूण 35 ठिकाणी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डनेही घेतली आहे. या शिबिराचा लाभ जवळपास 16 हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला आहे. मुंबई आणि नवी मुंबईत राबवण्यात आलेल्या शिबिरात जवळपास 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. मंगळवारी कूपर हॉस्पिटल येथे एफओजीएसआयच्या अध्यक्षा डॉ. रेश्मा पै यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरातून अॅनिमिया म्हणजेच पंडुरोग या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.


शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यावर पंडुरोग म्हणजेच अॅनिमिया होतो. हल्लीच्या जीवनशैलीत या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यातून उद्भवणारे गंभीर आजार टाळण्यासाठी 'अॅनिमिया फ्री इंडिया' ही मोहीम आम्ही हाती घेतली. अॅनिमियाविषयी जनजागृती व्हावी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत हा या शिबिरामागचा उद्देश आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची हिमोग्लोबिनची तपासणी करुन त्यांना डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला.

डॉ. रिश्मा पै, अध्यक्षा, एफओजीएसआय

के. जे. सोमय्या हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, नेरुळ, डॉ. आर. एन. कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, केडीएमसी डोंबिवली, नायर हॉस्पिटल या ठिकाणी आणि मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नांदेड आणि मिरज अशा अनेक शहरांत एकाच वेळी हा उपक्रम हाती घेण्यात आला.

शरीराला आवश्यक पोषणमूल्य न मिळाल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण घटते. विशेषत: आंबट, तेलकट, मसालेदार तसेच पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन केल्याने शरीराला पोषणमूल्य कमी होऊन अॅनिमियाला सामोरे जाण्याची वेळ येते. विशेषतः स्त्रियांना याचे गंभीर परिणाम सोसावे लागत असल्याचे निरीक्षणात दिसून आले. डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षणानुसार, अॅनिमियाचे प्रमाण गर्भवती महिलांमध्ये 87 टक्के, सामान्य महिलांमध्ये 55 टक्के, पुरुषांमध्ये 24 टक्के तर बालकांमध्ये 70 टक्के इतके आहे. गर्भधारणेच्या वेळेस अॅनिमियाचा वाढता दर तसेच उच्च बालमृत्यूदर यास अॅनिमिया कारणीभूत असल्याचे दिसून येते. या आजाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.

डॉ. रिश्मा पै, अध्यक्षा, एफओजीएसआय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा