Advertisement

मुंबईत एचअायव्हीचं प्रमाण ५६ टक्क्यानं घटलं

२०१०-११ मध्ये मुंबईत एचअायव्हीचे १४,२९१ रुग्ण होते. तर अाता १०१६-१७ मध्ये एचअायव्ही रुग्णांचा अाकडा ६७१८ अाहे.

मुंबईत एचअायव्हीचं प्रमाण ५६ टक्क्यानं घटलं
SHARES

जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. एड्स म्हणजे एचअायव्ही हा एक असा अाजार अाहे की ज्याबद्दल लोक बोलायचे टाळतात. घरात तर एड्स या विषयावर बोलण्यास जणू काय बंदीच घालण्यात अाली अाहे. मात्र, या एड्सविरोधात लढण्यासाठी मुंबईकर कुठेच कमी पडलेले नाहीत. मुंबईत एड्स मोठ्या प्रमाणावर घटल्याचं समोर अालं अाहे. 


जनजागृती अभियान 

२०१०-११ ते २०१६-१७ या ६ वर्षांमध्ये मुंबईत एचअायव्ही रुग्णांचं प्रमाण ५६ टक्क्यानं घटलं अाहे. मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध अाणि नियंत्रण समितीने अनेक वेळा राबवलेले जनजागृती अभियान हे मुंबईत एड्स रुग्ण घटण्यामागचं प्रमुख कारण सांगितलं जात अाहे. 


अाॅक्टोबरमध्ये ३८७० रुग्ण 

२०१०-११ मध्ये मुंबईत एचअायव्हीचे १४,२९१ रुग्ण होते. तर अाता १०१६-१७ मध्ये एचअायव्ही रुग्णांचा अाकडा ६७१८ अाहे. अाॅक्टोबर महिन्यात केवळ ३८७० रुग्ण अाढळल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध अाणि नियंत्रण समितीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डाॅ. श्रीकला आचार्य यांनी दिली. 


गर्भवतींमध्ये प्रमाण घटलं

मुंबईत मागील वर्षी गर्भवती महिलांमध्ये एचअायव्हीचं संक्रमण घटल्याचं समोर अालं अाहे. २०१०-११ मध्ये एचअायव्ही झालेल्या ४६६ गर्भवती महिला होत्या. २०१६-१७ मध्ये हा अाकडा १६२ अाहे. ६ वर्षात गर्भवती महिलांमधील एचअायव्हीचं प्रमाण ६५ टक्क्याने घटलं अाहे. 



हेही वाचा - 

२७ नोव्हेंबरपासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा