Advertisement

२७ नोव्हेंबरपासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम

एमआर लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सर्व खाजगी व सरकारी शाळेतील १७ लाख विद्यार्थ्यांना ही लस इंजेक्शनद्वारे देण्यात येणार आहे. त्याशिवाय २८ राज्यातील जवळपास ४१ कोटी मुलांना ही लस दिली जाणार अाहे.

२७ नोव्हेंबरपासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम
SHARES

२०२० सालापर्यंत गोवर आणि रूबेला या आजारांचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यानुसार गेल्या वर्षीपासून गोवर- रूबेला (एमआर) लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून येत्या २७ नोव्हेंबरपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह इतर ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईत एमआर लसीकरण मोहिमेची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागावर देण्यात आली आहे. 


२०१७ पासून लसीकरण 

गोवर हा विषाणुजन्य आजार असून तो लहान मुलांना जास्त प्रमाणात होतो. या आजारामुळं दरवर्षी देशात ५० हजार मुलांचा मृत्यू होतो. त्याशिवाय रूबेला हा देखील विषाणूपासून होणारा आजार असून यात ताप, खोकला, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ दिसणं अशाप्रकारची लक्षणे दिसतात. या दोन्ही आजाराला कायमचं हद्दपार करण्यासाठी २०१७ सालापासून शासनाच्यावतीनं एमआर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 


१४ कोटी मुलांना लस

एमआर लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सर्व खाजगी व सरकारी शाळेतील १७ लाख विद्यार्थ्यांना ही लस इंजेक्शनद्वारे देण्यात येणार आहे. त्याशिवाय २८ राज्यातील जवळपास ४१ कोटी मुलांना ही लस दिली जाणार असून या मोहिमेतंर्गत आतापर्यंत जवळपास १४ कोटी मुलांना ही लस देण्यात आली आहे. 


शाळांमध्ये मोहीम 

येत्या २७ नोव्हेंबरपासून नऊ महिन्यांपासून ते पंधरा वर्षापर्यंत बालकांना ही लस देण्यात येणार आहे. पहिल्या दोन आठवड्यांत शाळांमध्ये ही लसीकरण मोहीम राबविली जाणार असून तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात आरोग्य केंद्र, आंगणवाडी, क्षेत्रीय लसीकरण केंद्र, दवाखाने, उपनगरी रुग्णालय येथं उर्वरित मुलांना ही लस देण्यात येणार आहे. 



हेही वाचा - 

माझगावमधील हवा दिल्लीपेक्षाही वाईट!

छातीत घुसलेली सळी डोक्यातून बाहेर पडली, मजुराला वाचवण्यात झेन रुग्णालयाला यश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा