छातीत घुसलेली सळी डोक्यातून बाहेर पडली, मजुराला वाचवण्यात झेन रुग्णालयाला यश

तोल गेलेल्या राकेशच्या छातीत ३ फूट लोखंडी सळी घुसली व ती थेट त्याच्या डोक्यातून बाहेर पडली. बराच रक्तस्त्राव झाल्यानं त्याला वाचवणं अशक्य होतं. परंतु प्रसंगावधान राखून काही कामगारांनी राकेशला जवळच्या झेन रुग्णालयात दाखल केलं.

छातीत घुसलेली सळी डोक्यातून बाहेर पडली, मजुराला वाचवण्यात झेन रुग्णालयाला यश
SHARES

चेंबूरमध्ये एका उंच इमारतीचं बांधकाम करत असताना अचानक १३ फुटावरून तोल जाऊन राकेश जाधव या २४ वर्षीय कामगाराला गंभीर दुखापत झाली. त्याच्या छातीत ३ फूट लोखंडी सळी घुसल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. परंतु त्याला ताबडतोब चेंबूरजवळील झेन रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर राजेशला वाचवण्यात यश आलं आहे.


कधी घडली घटना?

मंगळवारी २० नोव्हेंबर रोजी चेंबूरजवळील उंच इमारतीचं बांधकाम सुरू असताना अचानक १३ फुटांवरून तोल जाऊन राकेश जाधव खाली पडला. तोल गेलेल्या राकेशच्या छातीत ३ फूट लोखंडी सळी घुसली व ती थेट त्याच्या डोक्यातून बाहेर पडली. बराच रक्तस्त्राव झाल्यानं त्याला वाचवणं अशक्य होतं. परंतु प्रसंगावधान राखून काही कामगारांनी राकेशला जवळच्या झेन रुग्णालयात दाखल केलं.


गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर झेन रुग्णालयातील न्युरोसर्जन डॉ. बटुक डिओरा, डॉ. प्रमोद मस्जीद, डॉ. प्रमोद काळे यांसह इतर डॉक्टरांच्या मदतीन त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ५ तासाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या छातीत घुसलेली लोखंडी सळी काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं राकेशचा जीव वाचवण्यात रूग्णालय प्रशासनाला यश आलं.हेही वाचा-

केईएम हॉस्पिटल देशात अव्वल

१२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पालिकेची टीबी नियंत्रणासाठी विशेष मोहीमसंबंधित विषय