Advertisement

कोरोनाचं नाव COVID-19 कसं पडलं? जाणून घ्या...

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा आजार ज्या विषाणूमुळे होतो त्या विषाणूला COVID-19 हे नाव दिलं आहे.

कोरोनाचं नाव COVID-19  कसं पडलं? जाणून घ्या...
SHARES

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूने आतापर्यंत हजारोंचा बळी घेतला आहे. भारतातही कोरोराने प्रवेश करून दोघांचा बळी घेतला आहे. भारतात हा विषाणू वेगाने पसरत आहे. नक्की कोरोना काय आहे हे आपण जाणून घेऊया. 

कोरोना विषाणूचा उल्लेख नोव्हेल कोरोनावरुन (2019 novel coronavirus) कोव्हीड १९ (COVID-19) असा करण्यात येऊ लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा आजार ज्या विषाणूमुळे होतो त्या विषाणूला COVID-19 हे नाव दिलं आहे.

  • COVID-19 मधील COVID हा शब्द तीन शब्दांची अद्याक्षरे घेऊन तयार झाला आहे.
  • COVID या शब्दात CO म्हणजे Corona, VI म्हणजे Virus आणि D म्हणजे Disease या तीन शब्दांचा समावेश आहे.

  • COVID च्या पुढे १९ हा आकडा आहे. हा आकडा या विषाणूचा कोणत्या साली शोध लागला त्यावरुन घेतला आहे
  • चीनमधील वुहानमध्ये  २०१९ मध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या विषाणूचा रुग्ण सापडला. त्यामुळे या विषाणूला नाव देताना १९ आकडा वापरण्यात आला. 

क्वारंटाइन म्हणजे काय?

कोरोना पसरू नये म्हणून क्वारंटाइन हा खबरदारीचा उपाय केला जातो. क्वारंटाइन करणे म्हणजे कोरोनाच्या संशयिताला वेगळे ठेवणे. संशयिताला घरी वेगळे ठेवणे म्हणजे होम क्वारंटाइन. क्वारंटाइन हा मूळ लॅटीन शब्द आहे. याचा अर्थ होतो ४० दिवसांचा कालावधी. त्याचा अर्थ अलग राहणे, विलगीकरण करणे  किंवा किनाऱ्याजवळ येण्याला मज्जाव (जहाजासंदर्भात) असा होतो. जुन्या काळात जहाजांमध्ये एखाद्या प्रवाशाला एखादा आजार झाल्यास जहाजावरील मालावर विषाणू पसरण्याचा धोका असायचा. असा संशय असलेल जहाज ४० दिवस किनाऱ्यापासून दूर ठेवले जायचे. करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेली व्यक्ती, किंवा ज्याच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसतात अशा व्यक्तीने स्वत:ला घरात क्वारंटाइन करायला हवे.



हेही वाचा -

Corona Virus : कोरोनाचा होईल विनाश, जुहूतल्या इस्काॅन टेम्पलमध्ये हातावर शिंपडल जातयं गोमूत्र

Coronavirus Updates: सिद्धिविनायक मंदिर पुढील काही दिवस बंद





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा