Advertisement

Coronavirus Updates: सिद्धिविनायक मंदिर पुढील काही दिवस बंद

मुंबईसह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मुंबईचं सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.

Coronavirus Updates: सिद्धिविनायक मंदिर पुढील काही दिवस बंद
SHARES

मुंबईसह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मुंबईचं सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती दिली आहे. त्यामुळं पुढील काही दिवस भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी जाता योणार नाही.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये तसंच, मंदिराचे भाविकांच्या प्रती असलेले सामाजिक दायित्व लक्षात घेता भाविकांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु, याकाळात न्यासातर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदतीसाठी, वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांसाठी सुरू राहणार आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे प्रभादेवी मंदिर देखील दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे (Corona Virus) लागण झालेले रुग्ण अधिक आढळल्यानं राज्य सरकारनं (State Government) अधिक खबरदार घेतली आहे.

सुरक्षेसाठी शाळा, कॉलेज, थिएटर्स, पार्क, जलतरण, जिमखाने बंद करण्यात आले असून, चित्रपट (Picture) व मालिकांचे (Serials) चित्रीकरणही (Shooting) बंद करण्यात येणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात बंद ३१ मार्च पर्यंत ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्यान वाढत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळं कोरोना रुग्णांच्या संख्ये वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून योग्यती खबरदारी घेतली जात आहे.हेही वाचा -

Coronavirus Updates: करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद

Coronavirus Update: अंधेरीतील सेव्हन हिल्स हाॅस्पिटल BMC च्या ताब्यात, ५०० खाटांची सुविधा होणारRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा