Advertisement

Coronavirus Updates: करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद

करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट (Picture) व मालिकांचे (Serials) चित्रीकरणही (Shooting) बंद करण्यात येणार आहे.

Coronavirus Updates: करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद
SHARES

भारतातील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे (Corona Virus) लागण झालेले रुग्ण अधिक आढळल्यानं राज्य सरकारनं (State Government) अधिक खबरदार घेतली आहे. सुरक्षेसाठी शाळा, कॉलेज, थिएटर्स, पार्क, जलतरण, जिमखाने बंद करण्यात आले आहेत. अशातच आता चित्रपट (Picture) व मालिकांचे (Serials) चित्रीकरणही (Shooting) बंद करण्यात येणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्य आणि चित्रपटगृहे बंद करण्यापाठोपाठ आता ३१ मार्च पर्यंत चित्रपट, मालिका, आणि जाहिरातींचं (Advertiement) चित्रीकरण बंद करण्यात येणार आहेत.

याबाबत रविवारी ‘इम्पा’ या ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्पलॉइज’, ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुसर्स असोसिएशन’, ‘इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हजन डिरेक्टर्स असोसिएशन’च्या संघटनेनं एकमतानं निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं हातावर पोट असणाऱ्या तंत्रज्ञ कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुरेशा चित्रीकरणाअभावी मालिकांच्या भागांचं पुन:प्रक्षेपणासारखे मार्ग अवलंबावं लागणार असल्याचं मत कलाकार (Actor) व्यक्त करत आहेत. रविवारी झालेल्या ‘इम्पा’च्या बैठकीत मालिकांना १९ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली असून, या ३ दिवसांत उर्वरित चित्रीकरण पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, परदेशात चित्रपटाच्या चमूला चित्रीकरण थांबवण्याचे निर्देश दिले आहे.

३१ मार्चपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यास चित्रीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत गोरेगाव चित्रनगरी, आरे रोड, चांदिवली, मालाड, मीरारोड, नायगाव, मढ आयलंड आणि ठाणे घोडबंदर इथं रोज मालिका, वेब सीरिज, जाहिरात आणि चित्रपटांचं चित्रीकरण सुरू असते. मागील १०-१५ दिवसांपासून सुरक्षेच्या उपायांची खबरदारी घेऊन चित्रीकरण सुरू होते. मात्र, ‘इम्पा’च्या या निर्णयामुळं मराठी हिंदी चित्रपट, मालिकांना चित्रीकरण थांबवावं लागणार आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी सरसावली गणेश मंडळं

आतापर्यंत ११,४६८ कोटी केले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - अजित पवार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा