Advertisement

Coronavirus update: अंधेरीतील सेव्हन हिल्स हाॅस्पिटल BMC च्या ताब्यात, ५०० खाटांची सुविधा होणार

अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालय (seven hills hospital andheri) मुंबई महापालिकेने (bmc) ताब्यात घेतलं या रुग्णालयात कोरोना व्हायरस (coronavirus) संक्रमीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५०० खाटा उपलब्ध होणार आहेत.

Coronavirus update: अंधेरीतील सेव्हन हिल्स हाॅस्पिटल BMC च्या ताब्यात, ५०० खाटांची सुविधा होणार
SHARES

अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालय (seven hills hospital andheri) मुंबई महापालिकेने (bmc) ताब्यात घेतलं या रुग्णालयात कोरोना व्हायरस (coronavirus) संक्रमीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५०० खाटा उपलब्ध होणार आहेत.

रुग्णालयातील डागडुजीचं काम झाल्यावर या ५०० खाटा उपलब्ध करण्यात येतील. या रुग्णालयाचा आढावा नुकताच आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी घेतला. त्यानंतर दाखल असलेल्या प्रवाशांबाबत विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली. तसंच आवश्यकतेनुसार मास्क उपलब्ध करून देण्याचा सूचना देखील दिल्या.

हेही वाचा- Coronavirus Update: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर

काय आहे प्रकरण?

अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील महापालिकेची इमारत (bmc) आणि जागा सेव्हन हिल्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड (seven hills hospital andheri) या कंपनीला २००५ साली काही अटी-शर्थींवर रुग्णालय चालवण्यास देण्यात आली होती. दीड हजार खाटांची सोय असलेलं हे रूग्णालय ३० वर्षांच्या करारावर सार्वजनिक खाजगी तत्वावर महापालिकेने संबंधित कंपनीला दिलं होतं. नियमानुसार महापालिका रुग्णालयातून येणाऱ्या रूग्णांसाठी या रुग्णालयात २० टक्के खाटा आरक्षित ठेवणं, आजी आणि माजी नगरसेवक, कर्मचारी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. 

परंतु रुग्णालय प्रशासनाकडून या नियमाचं पालन करण्यात येत नव्हतं. सोबतच महापालिकेचे १४०.८८ कोटी रूपये रुग्णालय व्यवस्थापनाने थकविल्यामुळे रुग्णालयाची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून होत होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (supreme court) गेल्यावर न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यावर रुग्णालय ताब्यात घेण्याचा (takeover) महापालिकेचा मार्ग मोकळा झाला होता. या जागी दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर सर्व सुखसोईंनी सज्ज रुग्णालय उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

हेही वाचा- Corona Virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा