Advertisement

व्हा..! धारावीत पुन्हा शून्य कोरोना रुग्णाची नोंद


व्हा..! धारावीत पुन्हा शून्य कोरोना रुग्णाची नोंद
SHARES

गतवर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला मुंबईतील धारावी परिसरात आता एकही रुग्ण नाही. धारावीमध्ये कोरोना संसर्ग हा नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. धारावीत बुधवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान धारावीमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. समुपदेश, योग्यवेळी वैद्यकीय उपचार, विलगीकरण, पाठपुरावा आणि चाचण्यांची वाढती संख्या यामुळे येथील संसर्गाचा उद्रेक नियंत्रित करण्यात आला.

बुधवारी दादरमध्ये ६ तर, माहीमध्ये १२ रुग्णांची नोंद करण्यात आली. मात्र धारावीमध्ये ही संख्या शून्य होती. धारावीमध्ये सध्या २५ उपचाराधीन रुग्ण आहेत. माहीममध्ये ८२ तर, दादरमध्ये ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सप्टेंबरमध्येही धारावीमध्ये रुग्णसंख्येमध्ये घट दिसून आली होती. महापालिका प्रशासनासोबत येथील स्थानिक डॉक्टरांनीही सामान्यांना मदतीचा हात दिला आहे. 

पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी कोरोना रुग्णांची संख्या वाढती असताना चाचण्या अधिक प्रमाणात करण्यात आल्या. नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्याबाबत जाणीव झाल्याने तसेच, दाटीवाटीच्या या परिसरामध्ये स्वच्छता राखण्याबाबत जागरूकता आल्याने हा संसर्ग रोखता आला आहे.

धारावीमध्ये १४, १५, २३ जून आणि ४, ७, १७ जुलै रोजीही करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. ऑगस्टमध्ये ३, ८, ११, १२, १५, १७, १८, २४ आणि २७ या तारखांनाही धारावीत एकही रुग्ण आढळला नव्हता. ३, ७ आणि १५ सप्टेंबर रोजी तेथे करोनाच्या एका रुग्णांची नोंद झाली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा